जे जय श्रीरामची घोषणा देतात ते राक्षस!
आणखी एका काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य!!
Nov 12, 2021, 20:47 IST
नवी दिल्ली ः काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकात हिंदुत्वावर केलेल्या टीकेवरून सध्या कोलाहल माजले असताना त्यात काँग्रेसच्या आणखी नेत्याने आग ओतण्याचे काम केले आहे.
राशीद अल्वी यांनी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना राक्षस म्हटले असून, जय श्रीरामची घोषणा देणारे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत असे ते म्हणाले. भाजपाने अल्वींच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे दुसरीकडे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत आली आहे. जे जय श्रीरामची घोषणा देतात त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, अशी मुक्ताफळेही अल्वींनी उधळली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी अल्वींच्या विधानावर आक्षेप घेत रामावरून राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. अनुयायांच्या भावना अल्वींनी दुखावल्या असून, लोकच त्यांना उत्तर देतील, असे शर्मा म्हणाले.