भाडेकरू महिलेला वाढदिवसानिमित्त भेट दिले अंतर्वस्त्र!; घालून दाखव म्हणाला...
Jan 21, 2022, 09:49 IST
बंगळुरू : घरमालकाने भाडेकरू महिलेला वाढदिवसानिमित्त अंतर्वस्त्र गिफ्ट केले. ती घालून दाखविण्याची मागणी केली आणि शरीरसंबंधाचीही मागणी केली. ४२ वर्षीय भाडेकरू महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पद्मनाभ नावाच्या या घरमालकाने तिला बाहेर फिरायला जाण्यासाठीसुद्धा बळजबरी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. फोनवरून तिला शरीरसंबंध ठेवण्याची सुद्धा मागणी घरमालकाने केली. शरीरसंबंध ठेवले नाही तर घर खाली करावे लागेल, असेही त्याने महिलेला धमकावले. महिला गेल्या १२ वर्षांपासून पद्मनाभच्या घरात भाड्याने राहत होती. वाढदिवशी त्याने गिफ्ट दिले तेव्हा आधी ते सामान्य वाटले. मात्र उघडून पाहिल्यानंतर मला धक्काच बसला, असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.