अभिनेत्रीने तिच्या त्‍या भागाचा उतरवलाय विमा!

 
लंडन ः विमा अनेक गोष्टींचा उतरवला जातो... पण एका अभिनेत्रीने आपल्या शरीराच्या अशा भागाचा विमा उतरवला आहे, की ते ऐकून सारे जग थक्क झाले आहे. विशेष म्हणजे हा विमा उतरविण्यासाठी अभिनेत्रीने चक्क 13 कोटी रुपये मोजले आहेत. तिने आपल्या पार्श्‍वभागाचा म्हणजेच नितंबाचा विमा उतरवला आहे.
35 वर्षांची ही मॉडेल असून, तिचं नाव नाथी किहारा असे आहे. तिने मिस बट वर्ल्ड 2021 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळेच तिला आता आपल्या नितंबाची जास्त काळजी लागली आहे, असे म्हणावे लागेल. स्पर्धकांपैकी तिने सर्वाधिक मते घेतली. विमा उतरविण्यासाठी 1.3 मिलियन पौंड अर्थात भारतीय रुपयांचे 12 कोटी 95 लाख रुपये तिने खर्च केले आहेत. किहारा सांगते, की मी पार्श्‍वभागामुळे प्रसिद्ध आहे. त्यामुळेच विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळेच विमा उतरवला. आहे. अर्थात मी सध्याच्या पार्श्‍वभागाच्या आकाराबद्दल समाधानी नाही. आणखी व्यायाम करून ते मला वाढवून आकर्षक करायचे आहेत, असे ती म्हणाली. पुरस्कार जिंकल्यानंतर तिने सोशल मीडिया टाकलेल्या फोटोला लाखो लाइक्स, कमेंट्‌स आल्या आहेत. तिचे इंस्टाग्रामवर 5 लाख 60 हजार फॉलोअर्स आहेत.