१६ वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षिकेचा लैंगिक अत्याचार

 
न्यूयॉर्क : १६ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्या शिक्षिकेनेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना अमेरिकेत समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. न्यूयॉर्क पोस्टने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, लेकलँड हायस्कूलमध्ये इंग्रजी शिकवणारी शिक्षिका अयाणा डोवीस (२०) हिला अटक करण्यात आली आहे. तिने कोणतेही प्रोटेक्शन न वापरता विद्यार्थ्यासोबत ४ वेळा लैंगिक संबंध ठेवले. दोन वेळा त्याच्या घरात जाऊन तर दोनदा तिने विद्यार्थ्याला घरी बोलावले होते, अशी कबुली तिने पोलीस चौकशीत दिली. या प्रकरणाची वाच्यता शाळेतीलच एका विद्यार्थ्याने केली. दोघांचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका विद्यार्थ्याच्या पाहण्यात आला. त्याने शाळा प्रशासनाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर शाळा प्रशासनाने यासंदर्भात तक्रार दिली. शिक्षिकेने गुन्हा कबुल केला असला तरी मी त्याच्यासोबत जबरदस्ती केली नाही, असे तिने पोलिसांना सांगितले. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने तिने केलेले कृत्य कायदेशीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.