धावत्या कारमध्ये दोघींवर बलात्कार!; नोकरीच्या आमिषाने आसामच्या तरुणींना आणले होते मध्यप्रदेशात!!
Updated: Jan 22, 2022, 13:27 IST
भोपाळ : धावत्या कारमध्ये दोन तरुणींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना मध्यप्रदेशात समोर आली आहे. मध्यप्रदेशातील सिलोर जिल्ह्यात ही घटना घडली. रात्री गाड्यांची तपासणी करत असताना एका कारमध्ये दोन तरुणी, एक महिला आणि दोन तरुण संशयास्पद अवस्थेत दिसून आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि धक्काच बसला. कारमध्येच दोन तरुणींवर बलात्कार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी दोन तरुण व एका महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणी आसाम राज्यातील रहिवाशी आहेत. काही दिवसांआधी भोपाळच्या एका महिलेसोबत त्यांची ओळख झाली होती. तुम्हाला भोपाळ येथे नोकरी लावून देते, असे आमिष त्या महिलेने दाखवले होते. त्यानंतर दोन्ही तरुणींना आसाम येथून सिहोर येथे आणण्यात आले. महिला, दोघी तरुणी व तरुणांनी एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर धावत्या कारमध्ये दोघांनी तरुणींवर बलात्कार केला. शानू व सगीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.