तरुणाने खऱ्या प्रेमाचा दिला पुरावा... पण दोन दिवसांनी अशी झाली अवस्था!

 
file photo
लंडन (वृत्तसंस्था) ः आपले समोरच्या व्‍यक्‍तीवर किती प्रेम आहे हे दाखविण्यासाठी कोण काय करेल काहीच भरवसा नाही. काही लोक तर वेडेपणाची हद्दच पार करतात. अशीच एक घटना थायलंडमधून समोर आली आहे. एक व्यक्ती प्रेयसीवर जीवापाड प्रेम करत होता. मात्र काही कारणास्तव त्याच्या प्रेयसीला त्याच्यापासून ब्रेकअप हवा होता. आपले प्रेम खरे आहे याचा पुरावा देण्यासाठी त्या व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर जे काही झालं ते तो आयुष्यभर कधीच विसरणारच नाही.
थायलंडमधील प्रसिद्ध वेबसाईट सनुकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. प्रेयसीसोबत नसतानाही त्याचं लक्ष दुसऱ्या एखाद्या महिलेकडे जाऊ नये आणि प्रेयसीच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये यासाठी तरुणाने हा प्रकार केला. प्रेयसी शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जात होती. त्यामुळे तो चिंतित होता. त्याला त्याच्या प्रेयसीचा विश्वास जिंकायचा होता. त्यामुळे त्याने प्रेयसीसमोरच त्याच्या प्रायव्हेट पार्टला लॉक लावला. दोन दिवसांनंतर त्याला प्रचंड वेदना सुरू झाल्या. वेदनेने ओरडत असल्याने त्याच्या आईने त्याची अवस्था बघून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तब्बल दोन दिवस लॉक लावून ठेवल्यामुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे सुजला होता. मग डॉक्टरांनी लॉक तोडले. काही दिवसांसाठी तरुणाला हॉस्पिटलमध्ये भरती राहावं लागलं. सध्या या घटनेची चर्चा रंगली आहे. मात्र एवढे उपद्व्याप करूनही त्याला त्याच्या प्रेयसीचा विश्वास काही जिंकता आला नाहीच. तिने त्‍याच्यासोबत नाते तोडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.