पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वांत लोकप्रिय नेते!
Nov 7, 2021, 16:09 IST
मुंबई ः ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगमध्ये ७० टक्के पसंती घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. मॉर्निंग कन्सल्टने हे रेटिंग जाहीर केले आहे. २०१९ पासून या संस्थेने यासंदर्भात माहिती गोळा करायला सुरुवात केली होती.
दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (६६ टक्के रेटिंग) आहेत. इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी (५८ टक्के रेटिंग) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमाकांवर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल (५४ टक्के रेटिंग) असून, पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (४७ टक्के रेटिंग) आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन चक्क सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांना ४४ टक्के रेटिंग आहे. पॉलिटिकल इन्टेलिजन्स रेटिंग कंपनी असलेल्या मॉर्निंग कन्सल्टने भारत, इटली, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेमधील सरकारी नेत्यांसाठी हे रेटिंग केले.