यूपीसह ५ राज्यांत पंतप्रधान मोदी नसणार स्टार प्रचारक!
Jan 30, 2022, 10:48 IST
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता वेगळी रणनिती अवलंबली असून, आगामी विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपायला १० दिवस उरले असून, मोदी यांनी अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही सारखेच महत्त्व देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर जवळपास सर्वच विधानसभा निवडणुका त्यांच्याच नावावर लढविण्यात आल्या होत्या. मात्र पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर ही रणनिती बदलण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोदी यांनी २६ प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र २९४ पैकी केवळ ७२ ठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून अाले होते. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड येथील विधानसभा निवडणुकांत मोदी हे राज्यस्तरीय नेत्यांशी मुकाबला करत असल्याचे चित्र निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.