National News : तरुणाने भुरळ घालून हॉटेलमध्ये नेत विवाहितेवर केला बलात्‍कार!; व्हिडिओ मित्रांनाही पाठवला, सहा महिन्यांपासून सहा जणांकडून सुरू होते शोषण!!

 
अलवर ः सामूहिक बलात्‍काराची आगळीवेगळी घटना राजस्‍थानमधील अलवर जिल्ह्यात समोर आली अाली आहे. जिल्ह्यातील एका गावात राहणारी ३० वर्षीय महिला मालाखेडा येथे दवाखान्यात आली होती. तिथे तिच्याकडे दूध घ्यायला येणारा तरुण तिला भेटला. त्‍याने तिला भुरळ घालून अलवर येथे हॉटेलमध्ये नेले. कोल्‍ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध करत खोलीत तिच्यावर बलात्‍कार केला. याचा व्हिडिओही बनवला व मित्रांना फॉरवर्ड केला. नंतर हा व्हिडिओ दाखवून पाच जणांनी तिच्यावर बलात्‍कार केल्याची तक्रार तिने पोलिसांत केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, अन्य आरोपी फरारी आहेत.

महिला विवाहित असून, दूध विक्रेती आहे. तिच्या घरी दूध घेण्यासाठी तरुण येत होता. डॉक्टरांना भेटण्यासाठी मालाखेडा येथे आल्यानंतर हा तरुण तिला रस्त्याने जाताना भेटला. त्‍याने तिला भुरळ घालून अलवर येथे आणले. एका हॉटेलमध्ये तिला नेत खोलीत नशेचा पदार्थ असलेले कोल्‍ड्रिंक तिला पाजले. ते पिताच ती बेशुद्ध झाली. त्‍यानंतर तरुणाने तिच्यावर बलात्‍कार केला. बलात्‍कार करतानाचा व्हिडिओ तयार करून त्‍याने आपल्या ५ मित्रांना शेअर केला.

हा व्हिडिओ दाखवून मग ५ तरुणांनीही तिला ब्‍लॅकमेल करत शरीरसंबंध ठेवण्यास बाध्य केले. एसपी तेजस्वी गौतम यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या एकाला अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल. विशेष म्‍हणजे जुलै २०२१ पासून जनावराप्रमाणे सहाही जण तिच्यासोबत सातत्याने गैरकृत्य करत असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.