प्रियकराला ओलीस ठेवून प्रेयसीवर बलात्‍कार!

निर्जनस्‍थळी होते युगुल, चौघांनी साधली संधी
 
 

पाटणा (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः प्रियकराला ओलीस ठेवून १३ वर्षीय मुलीवर बलात्‍कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये समोर आली आहे. फुलवारी शरीफ शहरातील निर्जनस्थळी हे प्रेमीयुगुल होते. पोलीस असल्याचे खोटे सांगून चौघांनी युगुलाला घेरले. तिचा विनयभंग करत एकाने तिला झुडुपात नेत तिच्यावर बलात्‍कार केला. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल करून शोध सुरू केला आहे. पीडितेचे एकानेच बलात्‍कार केल्याचे म्‍हटले असले तरी पीडितेच्या वडिलांनी मात्र चौघांनी बलात्‍कार केल्याचे म्‍हटले असून, तिच्या प्रियकराविरुद्धही तक्रार दिली. त्‍यामुळे पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

चौघे नराधम या प्रेमीयुगुलाचा पाठलाग करत होते. निर्जनस्‍थळी हे युगुल थांबले तेव्हा दुचाकीवरून आलेल्या चौघांनी आधी त्‍यांचा फोटो काढला. नंतर प्रियकराला ओलीस ठेवून त्‍यातील एका तरुणाने तिला झुडुपात नेले आणि तिच्यावर बलात्‍कार केला. पोलीस असल्याची बतावणी हे चौघे करत होते. बलात्‍कार केल्यानंतर नराधमांनी तिला मोबाइल क्रमांकही दिला. मी स्वतः पोलीस असून, पोलिसांकडे तक्रार करूनही काही फायदा होणार नाही, अशी भीती या तोतया पोलिसाने पीडित मुलीला दाखवली. घटनेनंतर पीडिता जीव देण्यासाठी घरातून निघून गेली होती. मात्र शहापूर भागात वाटसरूने तिला घरात आसरा देऊन पोलीस आणि तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. ४ गुन्हेगारांपैकी एकाची ओळख पटली असून, प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. मुलीने अद्याप तक्रार नोंदवली नसली तरी पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तपास करत आहेत.