सासरने जावयाची हत्‍या करून घरातच पुरले!

प्रेमविवाहाचा राग...
 
murder
नोएडा (उत्तरप्रदेश) ः जातीपातीचे भूत अनेकांत इतके भिनले आहे की ते कोणत्याही थराला जाण्यास मागे पुढे पाहत नाही. उत्तरप्रदेशातील एक थरारक घटना सध्या देशभर चर्चेत आली आहे. फर्रुखाबादेत प्रेमविवाह केल्याचा राग इतका होता, की मुलीच्या पित्‍याने जावयाची हत्‍या करून त्‍याला घरातच पुरले. वर्ष उलटल्याने आता राग शांत झाला असेल समजून मुलगी पतीला घेऊन दिवाळीला माहेरी आली होती. पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.

फर्रुखाबाद येथील मुलीशी सरह गावातील अंकितचे प्रेमसंबंध जुळले. अंकित नोएडात शिवणकाम करत होता. दोघांनी घरच्यांचा विरोध असूनही लग्न केले. घरच्यांनी टोकाची भूमिका घेऊनही मुलीने न ऐकल्याने तिच्या पित्‍याला राग होता. वर्षभर ती माहेरी गेली नाही. पण दिवाळीत तिला माहेरहूनच निरोप आला. आता सर्वकाळी ठीक झाले आहे. घरच्यांचा राग गेला आहे असे समजून तिने अंकितलाही माहेरी नेले. अंकित घरी आल्याचे पाहून आयतीच संधी लाभल्याने सासऱ्याने मुलीला गावातीलच नातेवाइकाने बोलावल्याचे सांगून तिकडे पाठवले. त्‍यानंतर अंकितची हत्‍या केली आणि घरातच पुरले. मुलगी परत आली तेव्हा तिने पतीबाबत विचाले.

तेव्हा तो नोएडाला निघून गेल्याची माहिती तिला दिली. तिने पतीला संपर्क केला. पण होऊ शकला नाही. दोन-तीन दिवस होऊनही अंकितशी संपर्क होत नसल्याने त्‍याच्‍या पत्‍नीने शोधाशोध सुरू केली. अंकितच्या नातेवाइकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी फर्रखाबाद गाठून तपास सुरू केला. छतावर मोबाइल फुटलेला आढळला. शेजारील घराजवळ माती दिसून आल्याने पोलिसांना सासरच्यांवरच संशय आला. त्‍यांनी सासऱ्याला ताब्‍यात घेऊन कसून चौकशी केली असता त्‍याने खुनाची कबुली दिली. पुरलेला मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. फतेहगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हैया लाल अवस्थी याने फर्रुखाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.