डॉक्टरच्या बायकोचा कुरिअर बॉयवर जडला जीव! लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भलतेच घडले...
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पार्सल पोहोचविणाऱ्या तरुणासोबत डॉक्टरच्या बायकोची चांगलीच ओळख झाली. ती ब्लू डार्ट कंपनीकडून कुरिअर मागवत होती. सततच्या बोलण्यातून जबलपूरमध्ये कुरियर कंपनीत नोकरी करणाऱ्या दीपकसिंह ठाकूर याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर दोघांनी दोन वर्षांपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तिला भेटण्यासाठी दीपक जबलपूरमधून भोपाळला येत होता.
२०१७ च्या १ जानेवारीला दीपकला भेटायला ती एका लॉजवर गेली. तिथे दीपकने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दीपकने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर दोघेही भोपाळमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोन वर्षांनंतर तिने दीपकवर लग्नासाठी दबाव टाकला. त्यावेळी दिपकने लग्नाला नकार दिला. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तक्रारीवरून दीपकविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पीडितेचे वय ३६ वर्षे असून २०१६ मध्ये तिच्या नवऱ्याचे निधन झाले होते. सध्या तिला १३ वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे.