कुत्रे जोरजोरात रडत असतात तेव्हा त्यांना खरच आत्मा दिसतो का? कुत्र्यांचे रडणे कुणाचेतरी देवाघरी जाण्याचा संकेत असतो का? लोक अस का म्हणतात....

 
yfhfyt
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): बातमीचे हेडिंग वाचून तुमच्याही मनात हे प्रश्न आलेच असतील. जोरजोरात कुत्रे रडताय म्हटले की कुणीतरी देवाघरी जाणार असे पूर्वीचे लोक म्हणायचे. आताही बऱ्याच भागांत तसा समज आहे. कुत्र्याचे रडणे अपशकुन समजले जाते. अनेकांना कुत्र्याचे रडणे पाहून किंवा ऐकून भीतीही वाटते. पण कुत्र्यांचे रडणे खरच अपशकुन असते का? कुत्र्यांना खरच यम किंवा आत्मा दिसतात का? याबद्दल विज्ञान काय म्हणत...हेच जाणून घेऊया..!

असं म्हणतात की कुत्र्यांना आत्मा दिसतो, किंवा कुणालातरी घेऊन जायला आलेली यमदेवता दिसते. सामान्य माणसांना ते दिसत नाही. त्यामुळे कुत्रे रडतात,ओरडतात. मात्र या याबद्दल नुकताच एका संस्थेने केलेला खुलासा अतिशय रंजक आहे.  एका रिपोर्ट नुसार कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडत.

एकटेपणा त्याला आवडत नाही.त्यामुळे कुत्र्याना एकटेपणा जाणवतो तेव्हा ते तो व्यक्त करण्यासाठी रडतात. कधीकधी आपल्या इतर सहकाऱ्यांना आपले लोकेशन करावे म्हणून ते विशिष्ट आवाज काढतात, त्यामुळे दुसऱ्या बाजूला असलेले त्याचे इतर साथीदार सुद्धा तसाच आवाज काढतात. याशिवाय कुत्र्यांना इजा झाली किंवा ते आजारी असेल तर ते रडतात असेही रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.