SDM महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी!
आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून सहकारी अधिकारीच करायचा ब्लॅकमेल!!
Nov 12, 2021, 00:51 IST
अहमदाबाद : आधी मैत्री केली, मैत्रीचा फायदा उचलत तिचे खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढले. नंतर याच व्हिडिओंच्या आधारे तिला शरीरसंबंधासाठी ब्लॅकमेल सुरू केले. गुजरात राज्यातील अहमदाबादेत ही धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष पीडित युवती आणि संशयित तरुण दोघेही सरकारी अधिकारी आहेत. अहमदाबादच्या सायबर क्राईम विभागाने या सरकारी अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडिता आणि २८ वर्षीय अधिकारी एकाच कार्यालयात काम करत असल्याने दोघांत चांगले संबंध तयार झाले होते. त्यातून मैत्रीही वाढली होती. डीसीपी अमित वसावा यांनी घटनेबद्दल पत्रकारांना सांगितले, की पीडित महिला अधिकारी एसडीएम असून, अरावली जिल्ह्यात कार्यरत आहेत. सरकारी अधिकारी मयंकविरोधात तिने शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार केली. मयंकचे लग्न झालेले असून, तो पीडितेवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यामुळे त्याने तिचे खासगी फोटो व आक्षेपार्ह व्हिडिओ तिला आणि तिच्या नातेवाइकांना पाठवले. त्याने तिला फोन, मेसेज करूनही त्रास दिला. नऊ वेगवेगळ्या क्रमांकांवरून कॉल, मेसेज केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.