दिल्ली, मुंबईत बॉम्‍बस्फोटाचा कट उघडकीस!

 
file photo
नवी दिल्ली : दिल्ली व मुंबईत बॉम्बस्‍फोट घडविण्याचा कट सुदैवाने उघडकीस आला असून, या कटाचा मास्टरमाईंड जर्मनीतील पोलिसांच्या हाती लागला आहे. पंजाबमधील लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटही याच मास्टरमाईंडने घडवला होता.
शिख फॉर जस्टिस (SFJ) चा तो सक्रिय सदस्य असून, जसविंदर सिंग मुलतानी असे त्याचे नाव आहे. सध्या त्याची जर्मनीत तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. जसविंदर मूळचा पंजाबमधील होशियारपूर येथील मुकेरियाचा रहिवासी आहे. त्याला दोन भाऊ असून, दोघेही जर्मनीत दुकान चालवतात. जसविंदर पाकिस्तानात गेला होता, याचीही चौकशी होत आहे. लुधियाना कोर्टात २४ डिसेंबरला बॉम्बस्फोट झाला होता. यात एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते.