३० टक्‍क्‍यांनी वाढली कंडोम विक्री!; उत्‍पादक कंपन्या खुश

 
नवी दिल्ली : कोरोना महामारी काळातील निर्बंध हटविल्यानंतर कंडोमच्या विक्रीत जगभरात मोठी वाढ झाली. भारतात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर कंडोम विक्रीत झपाट्याने वाढ झाली. निर्बंध हटविल्यानंतर लोक घराबाहेर पडले. सामाजिक संबंध भेटी - गाठी पुन्हा होऊ लागल्या. कंडोम बनविणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार कंडोम विक्रीत आता ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
मागील एका वर्षात कंडोम विक्रीत मोठी वाढ झाली. कंडोम बनवणाऱ्या ड्युरेक्स कंपनीने सांगितले, की २०२१ या ड्यूरेक्सच्या विक्रीत ३० टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचे मुख्य  कार्यकारी अधिकारी  गोह मिया कियात यांनी सांगितले, की जेव्हा जागतिक पातळीवर कंडोमच्या खरेदीत घट झाली होती तेव्हाही आमचा मार्केट शेअर टिकून होता. लवकरच कोरोनापूर्वी ज्या प्रमाणात कंडोमची विक्री होत होती त्या लक्ष्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. कोरोनानंतर आता पुन्हा कंडोम विक्री वाढू लागली आहे. यासोबतच पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ होत आहे. इंग्लंड, अमेरिका या देशांत पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात सुद्धा गेल्या काही महिन्यात पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.