अंडी आधी की कोंबडी... उत्तर मिळालं बरं!

 
file photo
लंडन (वृत्तसंस्था) ः आधी अंडी की कोंबडी या प्रश्नाचे कोडे सर्वांनाच पडले आहे. याचे गूढ उकलण्यासाठी खूप प्रयत्न झाले; मात्र यश मिळाले नाही. मात्र आता शास्त्रज्ञांना या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे.
डेली एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमधील शेफील्ड आणि वारविक विद्यापीठातील प्राध्यापकांनी अंडी आधी की कोंबडी या प्रश्नावर संशोधन कार्य केलं. दीर्घ अभ्यासातून जगात पहिले अंडे आले नसून, कोंबडी जगात आल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. संशोधन पथकाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ डॉक्टर कॉलिंग फ्रीमन यांनी सांगितलं की, अंड्याच्या कवचामध्ये ओव्होक्लिडीन नावाचे प्रोटीन असते. या प्रथिना शिवाय अंडी तयार होणे शक्यच नाही आणि हे प्रथिन फक्त कोंबडीच्या गर्भाशयातच बनू शकते. त्यामुळे जगात पहिले कोंबडी आली. तिच्या गर्भाशयात ओव्होक्लिडीन तयार झाले आणि त्यानंतर हे प्रथिन अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार जगात अंड्याच्या आधी कोंबडी आल्याचे समोर आले असले तरी त्यापूर्वी जगात कोंबडी कशी पोचली, काय प्रश्न मात्र कायम राहिला आहे.