एकाच वेळी चार गर्लफ्रेंड घरी पोहोचल्या... त्‍याने उचलले टोकाचे पाऊल!

 
कुचबिहार (कव्हरेज गुरू वृत्तसेवा) ः एकाच वेळी चार गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये असलेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. एकाच वेळी चौघीही त्याच्या घरी पोहोचल्याने गोंधळलेल्या बॉयफ्रेंडने हा टोकाचा निर्णय घेतला होता. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या कुचबिहारमधील जोरपटकी गावात हा प्रकार नुकताच समोर आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा तरुण एका मेडिकल दुकानात काम करत होता. एकाच वेळी चार गर्लफ्रेंडसोबत तो डेट करत होता. तो चौघींनाही फिरवत असल्याची माहिती मिळाल्याने चौघींनी एकमेकींना कॉल करून बॉयफ्रेंडच्या घरी जायचा निर्णय घेतला. एकाचवेळी चौघी समोर आल्याचे पाहून गोंधळलेल्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले.