देशविरोधी भूमिका;३५ युट्यूब चैनल,२ वेबसाईट बंद करण्याचे आदेश

 
नवी दिल्ली : देशविरोधी भूमिका घेऊन त्याचे प्रसारण करणाऱ्या ३५ यु ट्यूब चॅनल, २ न्‍यूज वेबसाइटसह २ व्टिटर खाते, २ इन्स्टाग्राम खाते आणि एका फेसबुक खात्याला ब्लॉक करण्याचे आदेश केंद्रीय सूचना प्रसारण मंत्रालयाने दिले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व खाते पाकिस्तानातून संचालित होत होते. भारतविरोधी बातम्या हे चॅनल प्रसारित करत होते.
सूचना प्रसारण मंत्रालयाचे सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले, की भारतविरोधी बातम्या या योद्धा समान आहेत. भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडून या खात्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. देश विरोधी षड्‌यंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला होता. २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल आणि २ वेबसाईट सूचना प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्या होत्या. नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा ३५ यु ट्यूब  चॅनल आणि २ वेबसाईट बंद करण्यात आल्या आहेत.