तुम्ही लै पाह्यले असतीन लग्न पण अस नसन पाह्यलं..! तिने स्वतःशीच लग्न केलं, स्वतःच्या भांगेत कुंकू भरल..आता स्वतःसोबत हनिमून करायला गोव्याला निघालीय! वाचा अजब लग्नाची गजब तऱ्हा..
क्षमा बिंदूने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर स्वतःशीच लग्न करणार असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. ११ जून रोजी लग्न करणार अशी घोषणा तिने केली होती. मात्र देशभरातून वाढता विरोध लक्षात घेता तिने ३ दिवस आधीच स्वतःच्या घरात स्वतःशी लगीनगाठ बांधली. आपले ज्याच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीशी आपण लग्न करत असतो, माझे स्वतःवर प्रचंड प्रेम आहे त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे क्षमा बिंदुने सांगितले. क्षमाला लग्न करायचे नव्हते मात्र आयुष्यभर प्रेयसी बनून रहाव अस तिला वाटत होत त्यामुळे आता आयुष्यभर ती स्वतःची प्रेयसी बनून राहणार असल्याचे सांगितले.
असा पार पडला लगीनसोहळा
क्षमा बिंदुच्या या निर्णयाला अनेकांचा विरोध होता. भारतीय संस्कृतीला हे शोभत नाही. आजपर्यंत कुणीही असा उपद्व्याप केला नाही अशी टीका तिच्यावर होत होती. मात्र तिच्या निर्णयाला घरच्यांचा पाठिंबा होता. स्वतःशीच लग्न करण्याचा हा पहिलाच सोहळा असल्याचे पंडित तरी येऊन काय करणार असा प्रश्न होताच . त्यामुळे मंत्रांची कॅसेट लावून तिने स्वतःची लग्न केले. लग्नाच्या आदल्या दिवशी मेहंदी आणि हळदीचा समारंभ पार पडला. लग्नाच्या दिवशी तिने स्वतः लाल रंगाची साडी नेसून नवरीचा मेकअप केला. स्वतःच्या भांगेत कुंकू भरले अन् सातफेरे घेऊन तिने स्वतःची लग्न केलं. तिच्या या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
हद कर दी..हनिमून साठी गोव्याला जाते म्हणे...
स्वतःची लग्न करून खळबळ उडवून दिल्यानंतर आता तिने आणखी एक घोषणा करून खळबळ उडवून दिली. आता स्वतःसोबत हनिमून साजरा करण्यासाठी ती गोव्याला जात आहे. तिथे राहून ती स्वतःसोबत हनिमून साजरा करणार असल्याचे ती सांगते. आता गोव्यात ती एकटी स्वतःसोबत हनिमून कसा साजरा करणार हे तिचं तिलाच ठाऊक..मात्र तिच्या हनिमुनच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळे विनोद रंगले आहेत..बातमी वाचतांना "ती स्वतःसोबत हनिमून कसा साजरा करणार?" असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल..तोच साऱ्यांना पडलाय .