अभ्यासानिमित्त भेटायला गेलेल्या कॉलेज तरुणीचे असे झाले आयुष्य उद्ध्वस्त!; मित्रानेच केला घात!!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिषेक एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. दोन वर्षांपूर्वी वही आणण्यासाठी तरुणी अभिषेकच्या घरी गेली होती. तिथे अभिषेकने कोल्ड्रिंक्समध्ये औषध टाकून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. मी तुझे फोटो व व्हिडिओ काढले आहेत. ते व्हायरल करेन, अशी धमकी अभिषेकने तिला दिली. त्यानंतर तो वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यामुळे ती गर्भवती राहिली.
एकदा गर्भपात केल्यानंतरसुद्धा अभिषेक तिच्याशी जबरदस्ती करत होता. दरम्यान, ती दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यानंतर त्याने पुन्हा तिचा गर्भपात केला. बदनामीच्या भीतीपोटी व तो फोटो व्हायरल करेल, या भीतीपोटी तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता. दरम्यान, तरुणीचे जानेवारीत लग्न ठरले व साखरपुडा झाला. ही बाब अभिषेकला माहीत झाल्यानंतर तो तरुणीच्या कुटुंबियांना फोन करू लागला. त्याने तिचे नग्न फोटो तरुणीच्या नातेवाईकांना पाठवले.
कॉलेजच्या अनेक मित्रांना देखील त्याने तिचे फोटो व व्हिडिओ पाठविले. तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी अभिषेकने संपर्क केला व त्यालाही तिचे ते फोटो व व्हिडिओ पाठविले आणि लग्न तोडायला सांगितले. त्यामुळे तिचे ठरलेले लग्न तुटले. अखेर दोन वर्षांपासून हे सर्व सहन करत असलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेकविरुद्ध बलात्कार आणि जबरदस्ती गर्भपात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.