बायकोची इच्छा नसतांना नवऱ्याने जबरदस्ती शारीरिक सबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणावे का? १६ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

 
dilli
नवी दिल्ली( लाइव्ह ग्रुप  नेटवर्क): नवऱ्याने बायकोशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणावे का या अतिमहत्वाच्या विषयावर १६ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणामध्ये दाखल झालेल्या सर्व याचीकांचा विचार करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान ११ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या २ न्यायाधीशांनी या विषयावर वेगवेगळा निर्णय दिला होता. त्यामुळे याला बलात्कार म्हणावे की नाही यासंबंधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे.

 भारतीय कायद्यानुसार बायकोशी जबरदस्ती शारीरिक संबधाला बलात्कार ठरवल्या जात नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बायकोची इच्छा नसताना तिच्या शरीरावर पशु -सारखे स्वार होऊन शारीरिक  संबंध ठेवणाऱ्या नवरोबांना लगाम घालण्यासाठी हा प्रकार बलात्कार ठरवण्याची मागणी अनेक संघटना करीत आहेत. एका सर्वेनुसार देशभरातील २९ टक्के महिलांची इच्छा नसताना किंवा त्या आजारी असताना त्यांचे पती त्यांचे लैंगिक शोषण करतात. त्यामुळे लिंगपिसाट नवऱ्यांचा हा कारनामा थांबला पाहिजे यासाठी हा प्रकार म्हणजे बलात्कार ठरविण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. १६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.