STATE NEWS नात्याने भाची लागत होती तरी मामाने धरला लग्नाचा हट्ट! नकार दिल्यावर भाचीचा खून करून स्वतः केली आत्महत्या! स्टेटस ठेवले गुडबाय...!!

 
कोल्हापूर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): नात्याने भाची लागत असली तरी त्याचे तिच्यावर प्रेम जडले. त्याने तिच्याकडे लग्नासाठी हट्ट धरला मात्र तिने नकार दिल्याने तिचा खून करून त्याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातील इचकरंजीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

 ऋतुजा प्रकाश चोपडे (२१, रा . खोतवाडी, इचकरंजी) या महाविद्यालयीन तरुणीचा गिरोली घाटातील पांडवलेणी परिसरात गळा दाबून खून करण्यात आला. या प्रकारानंतर आरोपी कैलास आनंद पाटील याने विषारी औषध प्राशन केले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
   
  प्राप्त माहितीनुसार काल, मंगळवारी सकाळी ऋतुजा कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली.  त्यानंतर ऋतुजा आणि कैलास पाटील यांची भेट झाली. दोघेही गिरोली घाटातील पांडवलेणी परिसरात फिरायला गेले. तिथे त्यांच्यात शब्दिक वाद झाला, त्यातच कैलासने ऋतुजाचा गळा आवळून खून केला. या प्रकारानंतर कैलासने विषारी औषध प्राशन केले. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर ही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कैलास पाटील याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले,मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 नात्याने लागत होता मावसमामा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा डी.फार्मसीचे शिक्षण घेत होती. त्याचवेळी तिची कैलास पाटील याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र त्यानंतर ते दोघेही जवळचे एकमेकांचे नातेवाईक असून तो तिचा मामा लागत असल्याचे त्यांना कळाले. मात्र असे असले तरी त्यांच्यातील प्रेमसंबंध कायम होते. मात्र ऋतुजा ने लग्नाला नकार दिल्याने कैलास ने हा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे...

सकाळी गुडबाय, संध्याकाळी द एंड..

कैलास एका सिमेंट कंपनीत सेल्समन म्हणून नोकरीला होता. काल, सकाळी त्याची कार घेऊन तो कामाला निघाला तेव्हा त्याने गुडबाय असे स्टेटस ठेवले होते तर संध्याकाळी द एंड असे स्टेटस त्याने ठेवले होते. ऋतुजा ही तिच्या आईवडिलांना एकुलती एक होती. तिच्या मृत्यूमुळे तिच्या आईवडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.