पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन; अहमदाबाद मध्ये घेतला शेवटचा श्वास; आज होणार अंत्यसंस्कार; नरेंद्र मोदींना आईंनी सांगितली होती "ही" शेवटची गोष्ट..

 
modi
अहमदाबाद( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज,३० डिसेंबर रोजी निधन झाले. मंगळवारी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती देण्यात आली. आज पहाटे साडेतीन च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांआधी हिराबेन मोदी यांचा १०० वा वाढदिवस झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेतली होती. ट्विटर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "त्या" शेवटच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी...

  "१०० वर्षांचा प्रवास ईश्वरचरणी थांबला. मी आई मध्ये नेहमी तपस्वी, निष्काम कर्मयोगी आणि मूल्याधिष्ठित जीवन असे त्रिमूर्ती स्वरूप पाहिले. जेव्हा १०० व्या वाढदिवशी आईला भेटलो तेव्हा तिने जे सांगितले ते कायम लक्षात राहील. काम करा बुद्धीने अन जीवन जगा शुद्धिने असा संदेश आईने मला दिला होता". अस ट्विट मध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हटल आहे.