खासदार प्रज्ञासिंह ठाकूरांना अश्लील व्हिडिओ कॉल!; तरुणी दिसली नग्नावस्‍थेत!!

 
नवी दिल्ली ः खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या व्हॉट्‌स ॲपवर काल, ६ फेब्रुवारीला रात्री व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलताच समोरच्या तरुणीने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली. खासदारांनी कॉल कट केला. त्‍यानंतर त्‍या मुलीचा रेकॉर्डिंग व्हिडिओ दुसऱ्या क्रमांकावरून खासदारांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. दोन्ही अनोळखी मोबाइल नंबर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मध्यरात्री दोनला टीटीनगर पोलीस ठाण्यात दिले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तरुणीचा शोध सुरू केला आहे.
यापूर्वीही खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अश्लील फोटो पाठविण्यात आले होते. आता व्हिडिओ कॉल करणाऱ्या आणि रेकॉर्डिंग व्हिडिओ कॉल पाठवणाऱ्या तरुणीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. ठाकूर या कोरोनाबाधित असल्याने त्‍यांना रुग्णालयात दाखल केले होते. ५ फेब्रुवारीला त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला. त्‍यानंतर सध्या त्‍या घरीच आराम करत आहेत. काल संध्याकाळी ७ वाजता एका तरुणीचा व्हॉट्स अॅपवर त्‍यांना व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलताच मुलीने कपडे काढायला सुरुवात केली आणि नग्न झाली. लगेचच खासदारांनी फोन कट केला. हा व्हिडिओ कॉल 6371 608 664  या नंबरवरून आला होता. यानंतर काही वेळाने रेकॉर्डिंग व्हिडिओ 82807 74239 या दुसऱ्या क्रमांकावरून पाठविण्यात आला होता.