National News: दगाबाज प्रियकर! बहिणीच्या मैत्रिणीचा ४ वर्षे घेतला उपभोग; गर्भवती झाल्यावर गावभर बोभाटा होण्याच्या भीतीने लस्सीतून पाजले गर्भपाताचे औषध!
प्राप्त माहितीनुसार २१ वर्षीय तरुणीने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. ती १६ वर्षांची होती तेव्हापासून तिचे मैत्रिणीच्या भावाशी अफेयर होती. ती जेव्हा जेव्हा मैत्रिणीच्या घरी जायची तेव्हा मैत्रिणीचा मोठा भाऊ तिच्यावर लाईन मारायचा. तो तिच्यापेक्षा २ वर्षांनी मोठा होता. त्याने प्रपोज केल्यावर तिनेही लगेच होकार दिला. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत जगण्या मरण्याच्या आणाभाका घेतल्या. त्याने लग्नाचा शब्द दिल्याने ती त्याच्या बहकाव्यात आली. होणारी बायकोचं आहे असे म्हणत तो तिच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. तिचे वय १८ वर्ष पूर्ण होण्याआधी ती पहिल्यांदा गर्भवती राहिली तेव्हा गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. दरम्यान ४ महिन्यांआधी ती दुसऱ्यांदा गरोदर राहिली.
लग्नासाठी आवश्यक वय पूर्ण असल्याने तिने त्याच्याभोवती लग्नाचा तगादा लावला. मात्र तो नकार देत असल्याने तिने तिच्या आईवडिलांना घडला प्रकार सांगितला. तिचे आईवडील तिला घेऊन त्याच्या घरी गेले. त्यावेळी त्याच्या आईवडिलांनी लग्नाला होकार दिला आणि लवकरच बैठक बसवू असा शब्द दिला. त्यानंतर दोन दिवसांनी तिला त्याच्या आईचा फोन आला. त्याच्या आईने तू होणारी सूनबाई आहे असे म्हणत तिला घरी बोलावले. तू थकली असशील असे म्हणत त्याने आणि त्याच्या आईने तिला लस्सी प्यायला दिली. थोड्या वेळात तिच्या पोटात दुखु लागल्याने ती घरी गेली. अचानक रक्तस्राव होऊ लागल्याने तिला दवाखान्यात भरती केले असता तिचा गर्भपात झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्या लस्सीतून गर्भपाताचे औषध पाजल्याचा संशय तिला आहे.
या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी दगाबाज प्रियकर व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.