National News दोघे पबजी खेळत राहिले, तिने एकाचवेळी खेळला दोघांसोबत प्रेमाचा "गेम"! दोघांना एकाचवेळी भेटायला बोलावले अन्

 
देहारादून: सोशल मीडियावर जमलेल्या प्रेम कहाण्या नंतर कशा फसतात याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. मात्र उत्तराखंड मध्ये एक अजब गजब प्रेम कहाणी समोर आली आहे. १९ वर्षाची तरुणी मोबाईलवर पबजी खेळता खेळता एकाचवेळी दोन तरुणांच्या प्रेमात पडली. मोबाईलवर हाय हॅलो सुरू झाले.. अन् एकाचवेळी तिने दोघांनाही  भेटायला बोलावले.  ती फक्त आपलीच "राणी" आहे असे त्या दोघांनाही वाटत होते.. मात्र समोरासमोर आल्यानंतर पबजीच्या नादात तिने आपलाच "गेम" केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

उत्तराखंड राज्यातील एका शहरात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीला पबजी खेळण्याचा छंद जडला होता. दिवसाच्या २४ तासापैकी अधिकाधिक वेळ तिचा पबजी खेळण्यात जात होता. पबजी खेळता खेळता दोन वर्षांपूर्वी तिची ओळख राजस्थानातील एका तरुणाशी झाली. तो सुद्धा चांगला पबजी लव्हर होता. त्यामुळे पाहता पाहता ती त्या तरुणाच्या प्रेमात पडली..

मात्र त्याआधी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील २२ वर्षीय तरुणाशी सुद्धा तिने सुत जुळवले होते. दोघेही तिच्याशी फोनवर बोलत होते. व्हॉटस् ऍप वर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुद्धा होत होता. मात्र ती दोघांसोबत एकाच वेळी गेम खेळत असल्याचे त्या दोघांच्या लक्षातही आले नाही. आठवडाभरापूर्वी तिने त्यांना भेटायला बोलावले. प्रेयसीला पहिल्यांदा भेटायचे म्हणून दोघेही उत्साहात नियोजित ठिकाणी पोहचल्यावर मात्र ते भानावर आले. दोघेही ती आपलीच प्रेयसी असल्याचा दावा करत होते. त्यामुळे तिथे त्या दोघांमध्ये चांगलाच राडा झाला. तुफान हाणामारी झाली..

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांना पोलीस ठाण्यात नेल्यावर पोलिसांना त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला.. पबजीच्या नादात तिने दोघांचाही गेम केल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी बिचाऱ्या तरुणांना सोडून दिले..