National News : मुलाच्या गर्लफ्रेंडवर लैंगिक अत्याचार!; ढोंगी बाबाकडे नेले, त्यानेही तोडले लचके!!
पीडित तरुणी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, ४ वर्षांआधी पानीगाव येथे राहणाऱ्या पुष्पेंद्र शुक्लासोबत तिचे प्रेमसंबंध होते. २० मार्च २०१८ रोजी ती पुष्पेंद्रच्या घरी असताना त्याचे वडील देवेंद्र शुक्ला तिथे आले. त्यांनी मुलाला मारहाण करून हाकलून लावले. त्यानंतर देवेंद्र शुक्ला यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला व अश्लील फोटो काढले. त्यानंतर नोकरीचे आमिष दाखवत नोकरी लावून देण्यासाठी देवेंद्रने तिच्याकडून १ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र नोकरी लावून दिली नाही.
तरुणीने तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे सांगितल्यानंतर देवेंद्रने चेकच्या माध्यमातून ७५ हजार रुपये तिला परत केले. दरम्यान तिने उर्वरित पैशांची मागणी केली तेव्हा देवेंद्रने तो भागवताचार्य नागेंद्र महाराज यांचा जवळचा विश्वासू शिष्य असल्याचे सांगितले व तरुणीची ओळख महाराजांसोबत करून दिली. तरुणीच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने नागेंद्र महाराजने रेशन आणि काही आवश्यक साहित्य तरुणीच्या घरी पाठवले.
यासोबतच नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. नागेंद्र महाराज फोनवरून तरुणीशी गप्पा मारायचा. दरम्यान ७ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता नागेंद्र महाराजने तरुणीला फोन करून घरी बोलावले व देवेंद्रने काढलेले अश्लील फोटो तिला दाखवत तिच्याशी जबरी संभोग केला. त्यानंतर नैराश्यात गेलेल्या तरुणीने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. २१ फेब्रुवारीला तिने आत्मदहन करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलिसांनी नागेंद्र महाराज आणि देवेंद्र शुक्लाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.