National News पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा शौक जडला अन् बायकोचा जीव घेतला!
जाहीर पाशांच लग्न होऊन २५ वर्ष झाली आहेत. त्याला ५ मुल आहेत. मात्र पन्नाशी गाठलेल्या जाहीर पाशाला या वयात पॉर्न व्हिडिओ पाहण्याचा छंद लागला. हातात स्मार्टफोन असल्याने वेळ मिळेल तेव्हा तो फक्त पॉर्न व्हिडिओ पहायचा. दोन महिन्यांपूर्वी पाशान एक व्हिडिओ पाहला. त्या व्हिडीओत त्याला त्याच्या बायकोसारखी दिसणारी महिला दिसली. त्यामुळे तो बायकोवर संशय घेऊ लागला. बायकोला सतत मारहाण करू लागला.
बायकोच्या बाहेर जाण्यावर त्याने बंदी घातली. एकदा बायकोला प्रचंड मारहाण केल्यानंतर तिला रुग्णालयात न्याव लागलं. बायकोच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार द्यायची तयारी दाखवली तेव्हा पाशाच्या बायकोन वडिलांना तक्रार देऊ नका म्हणून सांगितले. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर रविवारी सकाळी पाशाने पाचही मुलांदेखत बायकोला यमसदनी धाडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाशाच्या पत्नीला पाहून सारेच हादरले. पाशाच्या सासऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे.