National News संतापजनक ! सहा जणांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार; "ही" अट समोर ठेवली अन्...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० वर्षीय तरुणी शहरात राहणाऱ्या तिच्या नणंदेकडे गेली होती. गुरुवारी रात्री नणंदेने एका तरुणाला तरुणीला तिच्या घरी सोडायला सांगितले. मात्र तरुणीला घरी सोडण्यासाठी निघालेल्या तरुणाने तरुणीला निर्जनस्थळी नेले. त्यानंतर त्याने ५ मित्रांना फोन लावून तिथे बोलावून घेतले. ६ जणांनी मिळून तरुणीच्या शरीरावर त्यांनी वासनेची भुक भागविली.
तुझी सुटका करायची असल्यास तुझ्या मैत्रिणीला बोलावं अशी अट नराधमांनी तिच्यासमोर ठेवली. तिने तिच्या मैत्रिणीला बोलावल्यानंतर नराधमांनी तिच्यावर सुद्धा आळीपाळीने बलात्कार केला.घडलेली घटना कुणाला सांगितल्यास जिवे मारीन अशी धमकी देऊन तरुण घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर पीडित दोन्ही तरुणींनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५ आरोपींना अटक केली असून १ आरोपी अद्याप फरार आहे.