National News : इन्स्टाग्रामवरील ओळखीतून भेटायला बोलावून ११ वीतील तरुणीवर लैंगिक अत्‍याचार

 
भोपाळ : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून ११ वीतील तरुणीवर त्‍याने प्रेमाचे जाळे फेकले. त्‍या जाळ्यात तीही अडकली. त्‍याने तिला हॉटेलमध्ये नेत तिथल्या खोलीत कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले व तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केला. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये भंवरकुआँ भागात समोर आली आहे.
विनायक गिडवानी (२२) असे आरोपीचे नाव आहे. रूममध्ये आणल्यानंतर मद्यपान करत तिच्यावर त्‍याने बलात्‍कार केल्याचा आरोप आहे. तो बेराठी कॉलनीत राहतो. पीडित मुलगी भंवरकुआँ भागात राहते. मुलीची त्‍याच्याशी ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. दोघांत मैत्री झाली. प्रेमाच्या गुजगोष्टी वाढल्यानंतर त्‍याने तिला भेटायला बोलावले. हॉटेलमधील एका रूममध्ये जाऊन त्‍याने तिला गप्पा मारताना कोल्‍ड्रिंक पाजले. ते पिताच तिला गंुगी आली आणि ती बेशुद्ध पडली. मद्यपान करून त्‍याने तिच्यासोबत संबंध ठेवले. काही तासांनी ती शुद्धीवर आली तेव्हा तिला तिच्यासोबत गैरकृत्‍य केल्याचे कळले. तिने याबाबत त्‍याला जाब विचारला असता त्‍याने कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. भंवरकुआँ पोलिसांनी या प्रकरणी विनायकविरुद्ध पोक्‍सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.