NATONAL NEWS धक्कादायक!१४ वर्षीय मुलीवर दररोज १० ते १५ जण करायचे बलात्कार! स्पा- सेंटरच्या नावाखाली सुरू होता देहविक्रीचा गोरखधंदा!

 
गुरुग्राम ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): दिल्लीजवळच्या गुरूग्राम मधून सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली एका मॉलमध्ये देह विक्रीचा गोरखधंदा सुरू होता. विशेष म्हणजे या स्पा - सेंटरमध्ये अल्पवयीन कोवळ्या वयातील मुलींना वासनांध ग्राहकांच्या ताब्यात दिल्या जायचे. यातील एका पीडित १४ वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेली आपबिती कथन केली असून एका दिवसांत तब्बल १० ते १५ ग्राहक तिच्यावर बलात्कार करत असल्याचे तिने सांगितले.
 

प्राप्त माहितीनुसार एका महिला एजंट चा या कृत्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांना १२ वर्षांवरील व १६ वर्षाखालील मुली पुरवण्याचे काम ती महिला करीत होती. पिडीत १४ वर्षीय मुलीला पार्ट टाईम नोकरी देण्याची ऑफर देऊन मुलीला स्पा - सेंटरमध्ये स्वागतकक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली. दरम्यान एक दिवस  त्या मुलीला ग्राहकाची मसाज करून देण्यासाठी आतील कक्षात पाठवले. त्या ग्राहकाने तिच्यावर  जबरदस्ती बलात्कार केला.

त्या क्षणांचे व्हिडिओ काढून स्पा - सेंटरच्या मालकाला दिले. या प्रकारानंतर मालकाने तिला जबरदस्ती व्यवसायात उतरवले. तिने नकार दिल्यावर त्याने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतरच्या ५ दिवसांत सरासरी १० ते १५ जण तिच्या शरीराचा उपभोग घेत होते असे तिने पोलिसांना सांगितले. सहा दिवसानंतर मोठी हिम्मत धरून तिने कामावर जाणे बंद केले तेव्हा स्पा - सेंटर मालक व महिला एजंट यांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. 

तू पुन्हा कामावर परत आली नाही तर व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी ते देऊ लागले. अखेर पीडित मुलीने तिच्या आईवडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.