NATONAL NEWS लग्नानंतर नवरा करीत होता हनिमूनला जाण्याची तयारी! मात्र पहिल्या रात्रीच त्याचा तिच्यावरचा विश्वास उडला..! म्हणाला, मी समजत होतो तशी तू नाही..!

त्याचे झाले असे की लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरदेवाच्या मोबाईल वर एक व्हिडिओ आला. त्या व्हिडीओत त्याच्या बायकोने लग्नाआधी एका दुसऱ्या तरुणाशी शारीरिक संबंध ठेवल्याचे त्याला दिसले. ते पाहून संतापलेल्या नवरदेवाने त्या रात्रीचा प्लॅन आणि दुसऱ्या दिवशी हनिमूनला जाण्याचा प्लॅन देखील रद्द केला. मी समजत होतो तशी तू नसल्याने आपले नाते तुटले असे त्याने सर्वांसमोर जाहीर केले.
नवरीचे काय म्हणणे...!
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर नवरीला प्रचंड धक्का बसला. तिने कुटुंबीयांसोबत तडक पोलिस ठाणे गाठले. ज्याने व्हिडिओ पाठवला त्या सचिन नावाच्या तरुणाविरुद्ध बलात्काराची तर नवऱ्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली . गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये सचिन ने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता.
त्या संबंधाचे व्हिडिओ बनवून तो वारंवार तिला धमकावत होता. त्यानंतर त्याने अनेकदा तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे. सचिन तिला लग्नाचा आग्रह धरत होता मात्र तो बेरोजगार व दुसऱ्या जातीचा असल्याने पिडीतेने लग्नाला नकार दिला होता. त्याचा राग मनात ठेवून लग्नानंतर त्याने माझ्या नवऱ्याला तसला व्हिडिओ पाठवून माझी बदनामी केली असे पीडितेने पोलिसांना सांगितले.