NATIONAL NEWS होणाऱ्या डॉक्टर नवऱ्याचा होणारा बायकोने केला निर्दयी खून! कारण त्याने तिचे नग्न फोटो...
डॉ. विकास राजन याची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर प्रतिभाशी ओळख झाली होती. दोघांचेही प्रेम झाल्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. दरम्यान त्यांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. यंदा दिवाळीनंतर दोघेही लग्न करणार होते. मात्र काही दिवसांआधी प्रतिभाला इंटरनेट वर तिचे न्यूड फोटो दिसले. तिने याबाबत प्रियकर विकासला विचारणा केली.
यावर एक फेक अकाउंट्स इंस्टाग्राम वर तयार केले असून केवळ मनोरंजनासाठी तुझे नग्न फोटो अपलोड केल्याचे त्याने सांगितले. या प्रकाराने प्रतिभाचा डॉ. विकास वरील विश्वास उडाला. ती प्रचंड संतापली. दरम्यान १० सप्टेंबरला प्रतिभाने विकासला तिच्या मैत्रिणीच्या घरी नेले. तिथे याच मुद्द्यावरून प्रतिभाने विकासशी वाद घातला. प्रतिभाने आणि तिच्या मित्रांनी डॉ.विकासला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यावर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तो कोमात गेला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपासात या प्रकरणाचे गूढ उकलले असून प्रतिभाला अटक केली आहे.