NATIONAL NEWS बिचारा पती वेदनेने तडफडत होता ती मात्र शेजारी बसून तिच्या प्रियकराशी चॅटिंग करत होती! प्रियकराचे प्रेम मिळवण्यासाठी पतीच्या जेवणात टाकल विष..!!
प्राप्त माहितीनुसार पुतुल कुमारी असे या विकृत महिलेचे नाव असून ती तिच्या प्रियकराच्या प्रेमात पागल झाली होती. त्यामुळे तिचा नवरा असलेल्या अजयची वर्षभरापासून तिचे वाद सुरू होते. पती असताना सुध्दा तिचा प्रियकरावर जीव जडला होता. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती. पती अजयला मात्र ती जेवायला वाढून सुध्दा देत नव्हती असे अजयच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान २५ वर्षीय पुतुल कुमारी हिने आयुष्यातून अजयचा काटा काढण्याचे ठरवले. शनिवारी रात्री तिने अजयच्या जेवणात विष कालवले. त्यामुळे झोपेच्या आधीच्या अजयची प्रकृती बिघडली. त्याच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या. तो वेदनेने विव्हळत होता मात्र त्याची बायको शेजारी बसून प्रियकराशी चॅटिंग करण्यात व्यस्त होती. मात्र पुतुल कुमारीचा हा प्लॅन फसला. तिच्या सासऱ्यांना म्हणजेच अजयच्या वडिलांना अजयच्या खोलीत काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.
त्यांनी तातडीने अजयला उपचारासाठी दवाखान्यात हलवले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे अजयच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यानंतर त्याने पत्नीच्या कारनाम्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अजयच्या पत्नीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.