NATIONAL NEWS नवऱ्याने बायकोला तलाक दिला पण कारण वाचून तुम्ही डोक्याला हात लावून घ्याल! अस कुठ असतं का राजा...

 
मेरठ ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्र सरकारने तीन तलाक विरुद्ध कायदा केला. मात्र अजूनही तलाक देण्याच्या घटना समोर येत आहेत. अशा घटनांमध्ये पोलीस तलाक देणाऱ्या विवाहितेच्या नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करतात. अगदी क्षुल्लक कारणावरून तलाक देण्याच्या घटना घडत असतात. मात्र उत्तर प्रदेशच्या मेरठ मध्ये तलाक चे एक  प्रकरण समोर आले आहे. मात्र तलाक चे कारण अगदी विचित्र होते. तक्रार ऐकून पोलिसांना सुद्धा डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ आली.

काय आहे प्रकरण
   उत्तर प्रदेशातील मेरठ येथील ही घटना आहे. २८ वर्षीय विवाहितेने याप्रकरणाची तक्रार दिली. नजमा बेगम असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. आठ वर्षांआधी तिचे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर वजन वाढल्याचे तिच्या नवऱ्याचे म्हणणे आहे. वजन वाढल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याचा आरोप नजमाने तक्रारीत केला आहे.  मोहम्मद सलमान असे तिच्या पतीचे नाव आहे. विशेष म्हणजे दोघांना ७ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे.

मात्र तिचे वजन वाढत असल्याने तो सतत तिला टोमणे  मारत होता. वजन वाढल्याने बायकोचा तो सर्वांदेखत अपमान करायचा. तिच्या खाण्यावर लक्ष ठेवायचा. अनेकदा तिच्या जेवणाचे ताट उचलून ठेवायचा असा आरोप नजमाने तक्रारीत  केला आहे.  पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहम्मद सलमान याला अटक केली आहे.