NATIONAL NEWS शाळेच्या म्हाताऱ्या संचालकांचा कारनामा! आठव्या वर्गातील मुलीवर दोन वर्ष बलात्कार केला! कांड उघडकीस आल्यावर म्हणतो मी तिच्याशी लग्न करायला तयार

 
मेरठ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये समोर आली आहे. एका शाळेच्या संचालकांने आठव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला नशा येणारे औषध पाजून बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ केला. त्यानंतर तब्बल दोन वर्षे तो तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. अत्याचार असह्य झाल्यावर पीडित मुलीने आईवडिलांना ही बाब सांगितली. त्यानंतर पीडित मुलीचे आईवडील जाब विचारायला जेव्हा संचालकाच्या घरी गेले तेव्हा मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे असे संतापजनक उत्तर दिले.

मेरठ जिल्ह्यातील लिसाडी गेट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शाळेत पीडित मुलगी यंदा दहावीला आहे. ती आठव्या वर्गात असताना म्हाताऱ्या वासनांध संचालकांने तिला नशा येईल असे पेय पाजले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्या क्षणाचा व्हिडिओ देखील त्याने काढून ठेवला. मात्र त्यानंतर त्याची वासनेची भूक वाढतच गेली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार मुलीचा उपभोग घेत होता. २ वर्षात तो अनेकदा तिच्या शरीरावर तुटून पडायचा असे मुलीने पोलिसांना सांगितले.
  
 म्हाताऱ्याचे चाळे असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने ही बाब तिच्या आईवडिलांना सांगितली. यावेळी पीडित मुलीच्या आईवडिलांना प्रचंड मोठा धक्का बसला. ते या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी जेव्हा संचालकाच्या घरी पोहचले तेव्हा संचालकांने दिलेले उत्तर ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे असे उत्तर त्या वासनांध संचालकांने दिले. विशेष म्हणजे संचालक म्हातारा असून त्याचे लग्न झालेले आहे. अखेर पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.