NATIONAL NEWS धक्कादायक ! मुलगा कोमात गेल्याचे समजून १८ महिने घरातच ठेवला मृतदेह
विशेष म्हणजे विमलेश बरे व्हावेत म्हणून त्यांची पत्नी आणि आई दररोज या मृतदेहावर गंगाजल शिपडत होती. एका खाजगी रुग्णालयाने गेल्या वर्षी २२ एप्रिल २०२१ रोजी विमलेश यांना मृत घोषित केले होते.
मागील १८ महिन्यांपासून विमलेश कार्यालयात न आल्याने त्यांच्या कार्यालयाने चौकशी केली. या कामासाठी प्राप्तिकर विभागाने आरोग्य विभागाची मदत घेतली. काल, २३ सप्टेंबर रोजी हे पथक दीक्षित यांच्या घरी गेले. तेव्हा दीक्षित कोमात गेल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. मात्र पथकाने एका पेटीत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन लाला लजपतराय रुग्णालय गाठले .
त्यानंतर दीक्षित यांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीक्षित यांच्या पत्नी मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे असले तरी १८ महिने मृतदेह घरात असताना सुध्दा तो शेजारच्या लोकांना सुद्धा कुणकुण न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.