NATIONAL NEWS धक्कादायक! बेपत्ता महिला सापडली अजगराच्या पोटात; १६ फूट लांब अजगराने महिलेलाच गिळले, कामावरून घरी परत न आल्याने सुरू होती सर्वत्र शोधा शोध..!

 
hvgh
 वृत्तसंस्था:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १६ फूट लांब असलेल्या एका अजगराने चक्क ५२ वर्षीय महिलेला गिळंकृत केल्याची घटना इंडोनेशियातील जांबी प्रांतात समोर आली आहे. चहाच्या मळ्यात काम करणारी महिला काम आटोपल्यानंतर घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू असताना हा प्रकार समोर आला.
 

इंडोनेशियातील जांबी प्रांतात एक महिला चहाच्या मळ्यात काम करत होती. ती महिला रविवारी संध्याकाळी कामावरुन घरी परतत होती. परंतु काम आटोपल्यानंतर बराच वेळ ती घरी आली नाही. महिला बेपत्ता झाल्याचे समजतात कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली.

दरम्यान पोलिसांसह गावकऱ्यांनी त्या महिलेचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना त्या ग्रामस्थांना एक सोळा फूट लांब असलेला अजगर दिसून आला, परंतु त्या अजगराचे पोट चांगलेच फुगलेले होते. यावेळी त्या अजगराच्या फुगलेल्या पोटावरून नागरिकांना संशय बळावला. तेव्हा काही लोकांनी त्या अजगराला मारलं आणि त्याचं पोट कापून पाहिलं असता अजगराच्या पोटात महिलेचा मृतदेह सापडला.