NATIONAL NEWS खळबळजनक! ६५ वर्षाच्या म्हाताऱ्याला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायचे होते! अडसर ठरणाऱ्या म्हातारीच्या खुनाची सूनेलाच दिली सुपारी..धारधार शस्त्राने केला खून!!

 
ghjghj
भोपाळ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): ६५ वर्षाचे वय होऊनही त्या म्हाताऱ्याची वळवळ काही थांबत नव्हती. वासनेचा रहमानी किडा त्याला स्वस्थ बसू देईना..त्यामुळे गावातीलच एका ३५ वर्षीय विधवा महिलेवर त्याची नजर पडली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले..तुझ्यासोबत लग्न करतो असा शब्द म्हाताऱ्याने तिला दिला..पण यात अडथळा येत होता म्हाताऱ्याच्या वृध्द पत्नीचा..मग काय  दुसऱ्याचा लग्न करायचे स्वप्न पाहणाऱ्या या म्हाताऱ्याने स्वतःच्या पत्नीच्या खुनाची सुपारी सुनेला दिली..सासूच्या जाचाला कंटाळलेल्या सुनेने मग सासूची धारदार शस्त्राने हत्या केली. ही खळबळजनक घटना मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यात अत्रिला गावात दोन दिवसांपूर्वी घडली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालाय..!

प्राप्त माहितीनुसार अत्रिला गावातील एका ६५ वर्षीय म्हाताऱ्याचे गावातील एका विधवा महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधात म्हाताऱ्याची पत्नी अडथळा ठरत होती. म्हाताऱ्याला दुसऱ्यांदा बोहल्यावर चढायचे होते मात्र आधीची बायको असताना हे कसे जमेल अस विचार त्याच्या मनात सुरू होता. आता पत्नीला वाटेतून दूर करून दुसरे लग्न करायचेच हा निश्चय म्हाताऱ्याने केला. त्यासाठी त्याने स्वतःच्या सुनेला सासूच्या हत्येची सुपारी दिली..

सासूच्या जाचातून सुटका मिळेल म्हणून सुनेने देखील सासूची हत्या करण्याची तयारी दर्शवली..दोन दिवसांपूर्वी तिने धारधार शस्त्राने सासूची हत्या केली..! विशेष म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सुनेने सासऱ्यासोबत पोलीस ठाण्यात धाव घेत सासूची अज्ञातांनी हत्या केल्याची तक्रार दिली. मात्र पोलिसांनी नेमलेल्या खबऱ्यांकडून नेमकी माहिती पोलिसांना मिळाली. म्हाताऱ्याने गावात अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना कळल्यावर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच सासऱ्याने व सुनेने हत्येची कबुली दिली.