NATIONAL NEWS लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या लक्षात आलं नवरा बिनकामाचा..! दिराने घेतला संधीचा फायदा; विवाहिता पोलीस ठाण्यात पोहचली, म्हणाली माझी फसवणूक झाली..!!

 
kraim
हरदोई ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): उत्तरप्रदेशच्या हरदोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नवीनच आणि पोलिसांची डोकेदुखी वाढवणारे प्रकरण समोर आले. २१ वर्षीय विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तिची फसवणूक आणि छळ झाल्याची तक्रार दिली. लग्नानंतर पहिल्याच रात्री तिला तिचा नवरा शारीरिक दृष्ट्या कार्यक्षम नसल्याचे कळाले. त्यामुळे तिच्या लहान दिराने या संधीचा फायदा घेत वहिनीशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.. खुद्द तिचा नवराच तिला  त्याच्या लहान भावाशी शारीरिक संबंध ठेवायला सांगत होता. 
    

घरच्यांचा पाठिंबा असल्याने विवाहितेचा दिर मनात येईल तेव्हा वहिनीशी जबरदस्ती करायचा . अजित गुप्ता असे या नराधम दिराचे नाव असून प्रियांशू गुप्ता असे निष्क्रिय नवऱ्याचे नाव आहे. गेल्या वर्षी पिडीतेचे लग्न प्रियांशु सोबत झाले आहे. तो शारीरिक दृष्ट्या कार्यक्षम नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांना माहीत होते मात्र तरीही त्याचे माझ्यासोबत लग्न लावून देण्यात आले असा आरोप पीडित विवाहितेने केला.
   
  १४ जूनला रात्री उशिरा अजित दारू पिऊन घरी आला. तो विवाहितेचा दिर असताना नवरा असल्यासारखा अधिकार गाजवत होता. १४ जूनच्या रात्री त्याने तिला जेवण वाढायला सांगितले. ती जेवण वाढत असताना त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विवाहितेने आरडाओरड केला. तिचा आवाज ऐकून तिचा पती व सासू सासरे आले. मात्र त्यांनी अजितला ओरडण्याऐवजी सुनेलाच धमकावले . तुला त्याची सेवा करावीच लागेल असे म्हणत तिला इस्रीचे चटके देण्यात आले.
 

सासरची मंडळी जिवानिशी मारण्याचा डाव रचत असल्याचे लक्षात येताच तिने कसाबसा पळ काढत पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर तिने तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दिराविरुद्ध बलात्काराचा तर पती व सासरच्या लोकांविरुद्ध फसवणूक व छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे