NATIONAL NEWS कब्रस्तानात नेऊन आधी विवाहितेवर बलात्कार!; नंतर धर्मपरिवर्तनासाठी दबाव; वाचवायला आलेल्या नवऱ्यासोबत अनैसर्गिक कृत्य
गेल्या आठवड्यातील मंगळवारी सकाळी पीडित ३० वर्षीय महिला कामासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी आकाश कुरेशी (३०) नावाच्या एका तरुणाने तिला पैसे देण्याचे आमिष दाखवून कब्रस्तानात नेले. तिथे आधीच त्याची पत्नीही येऊन थांबलेली होती . कुरेशीने शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्याशी जबरदस्ती संभोग केला. पीडित विवाहिता शुध्दीवर आल्यानंतर तिने घरी जाऊद्या असे कुरेशी याला म्हटले असता त्याने आणि त्याच्या पत्नीने पीडितेवर जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला.
थोड्याच वेळात पीडितचा पती तिथे आला तेव्हा आरोपीने त्याच्या साथीदारांना तिथे बोलावले. पीडित विवाहितेच्या नवऱ्यावर आरोपींनी अनैसर्गिक कृत्य केले आणि नशेचा पदार्थ देऊन त्यालाही बेशुद्ध केले. काही वेळानंतर पीडितेचे नातेवाईक शोधत शोधत घटनास्थळी पोहचले मात्र तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. पीडितेच्या नातेवाईकांनी पीडित पती पत्नीची सुटका केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवरून आकाश कुरेशी , त्याची पत्नी व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.