NATIONAL NEWS चिमुकल्या नातीच्या शरीरावर वासनांध आजोबाची वक्रदृष्टी! न्यायालयाने सुनावला तब्बल १४२ वर्षांचा तुरुंगवास

 
कोची (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केरळ मधील एका न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आजोबाला चांगलाच धडा शिकवला. ४७ वर्षीय आरोपीला न्यायालयाने तब्बल १४२ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असून ५ लाख रुपयांचा दंड ही सुनावला आहे. नराधम आजोबाने स्वतःच्या सख्ख्या १० वर्षीय नातीवर बलात्कार केला होता.

 केरळच्या पाथनमथिट्टा न्यायालयाने सुनावलेली ही शिक्षा आतापर्यंत जिल्हा न्यायालयात सुनावलेली सर्वात मोठी शिक्षा आहे.  गेल्या वर्षी २०२१ मध्ये ४१ वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या नातीचे लैंगिक शोषण केले होते. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. 
  
 प्रकरणातील सर्व साक्षीदार, पुरावे , वैद्यकीय नोंदी या पीडित मुलीच्या बाजूने होत्या. अखेर आजोबाने नातीचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने दोषी आरोपीला विविध कलमाअंतर्गत  १४३ वर्षांचा सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. याशिवाय दोषी आरोपीला ५ लाख रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागणार आहे.