NATIONAL NEWS लग्न होऊन दोनच महिने झाले अन् नवी नवरी निघाली ७ महिन्यांची गर्भवती! सत्य समोर आल्यावर नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
प्राप्त माहितीनुसार जून महिन्यात विवाहितेचे लग्न झाले होते. दोन दिवसांपूर्वी पोटात दुखू लागल्याने तसेच पोटाचा आकार पाहून संशय वाटल्याने सासरच्या लोकांनी तिला दवाखान्यात नेले. दरम्यान तपासणीअंती विवाहिता ७ महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर विवाहितेच्या नवऱ्याला धक्का बसला. लग्न होऊन दोनच महिने झालेले असताना ७ महिन्यांची गर्भवती कशी असा सवाल उपस्थित केल्यानंतर विवाहितेने घडलेली हकीकत सांगितली.
जानेवारीत झाला होता बलात्कार..!
विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात अहमदपूर येथील मोनू कुशवाह या तरुणाने तिच्यावर जंगलात नेऊन बलात्कार केला होता. त्या प्रकारचा व्हिडिओ सुद्धा त्याने रेकॉर्ड केला होता. त्यामुळे घडला प्रकार कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करीन अशी धमकी मोनू ने तिला दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीपोटी तिने कुणालाही घडला प्रकार सांगितला नव्हता. मात्र ती ७ महिन्यांची गरोदर असल्याने आता सगळा घटनाक्रम समोर आलाय. पोलिसांनी आरोपी मोनू कुशवाह विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असला तरी विवाहितेचा पती मात्र आता तिला नांदवायला तयार नाही...!