NATIONAL NEWS म्हाताऱ्या आजोबाचा नातीवर बलात्कार! सावत्र आईच म्हणायची, जा त्यांच्या खोलीत, झोप त्यांच्याजवळ..! पोट दुखायला लागल्यावर उजेडात आले कांड..!

 
पटना( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): १४ वर्षीय नातीवर आजोबांनीच बलात्कार केल्याचा धक्कादायक अन् तितकाच निंदनीय प्रकार समोर आलाय. बिहारच्या दिघा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात ही घटना घडली. विशेष म्हणजे या काळ्या कृत्यात मुलीच्या सावत्र आईचा सहभाग होता. तीच तिच्या वडिलांच्या खोलीत मुलीला झोपायला पाठवायची अन् ६० वर्षांचा नराधम म्हातारा रात्रभर नातीच्या शरीराचे लचके तोडायचा.  मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर हे सगळे कांड उजेडात आले. मुलीच्या तक्रारीवरून मुलीच्या सावत्र आईसह आजोंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. लग्नानंतर महिनाभर मुलीची सावत्र आई मुलीला चांगले वागवत होती. मात्र त्यानंतर ती तिचा छळ करू लागली. माझे काम ऐकले नाही तर उपाशी ठेवीन , खायला देणार नाही अशी धमकी सावत्र आई मुलीला द्यायची. दरम्यान काही दिवसांनी सावत्र आईचा म्हातारा बापही तिच्या घरी येऊन राहू लागला. ६० वर्षाच्या या म्हाताऱ्याची मुलीला पाहून वासना जागृत झाली होती.

तो तिच्याकडे वाईट नजरेनेच पहायचा. दरम्यान एक दिवस मध्यरात्री मुलीच्या सावत्र आईने मुलीला झोपेतून उठवून म्हाताऱ्याच्या खोलीत पाठवले. ते तुझे आजोबांच आहे, झोप त्यांच्याजवळ असे सावत्र आई मुलीला म्हणाली. मुलगी खोलीत गेल्यावर सावत्र आईने दरवाजा बाहेरून बंद केला. त्यानंतर रात्रभर त्या म्हाताऱ्याने तिच्या शरीराचे लचके तोडून बलात्कार केला. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना अन् तुला जीवाने मारीन अशी धमकी दिली. भीती पोटी तिने कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. त्यामुळे अनेक दिवस हा खेळ सुरू होता. 

  दरम्यान काही दिवसांनी मुलगी तिच्या मामाच्या घरी गेल्यानंतर तिचे पोट दुखू लागले. तिला उपचारासाठी दाखल केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर दिघा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.