NATIONAL NEWS बापा बापा..! ४३ वर्षात त्याने केले ५३ लग्न! आता गुडघे टेकले, म्हणतो...
अबू अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार ह्या काही ठरवून केलेल्या गोष्टी नाहीत. जेव्हा पहिले लग्न केले तेव्हा दुसरे लग्न करण्याचा विचार नव्हता. पहिल्या बायकोपासून १ मुलगा झाला, तीन वर्ष चांगला संसार टिकला. मात्र बायकोसोबत पटले नाही, तिच्यासोबत भांडण झाले वयाच्या २३ व्या वर्षी दुसरे लग्न केले. माझ्याकडून हे सगळ नाईलाजाने झालं असही ते म्हणतात.
अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीत अनेक समस्या होत्या. मी सर्वोत्कृष्ट जोडीदाराचा शोध घेत होतो. शांतता आणि स्थिरता मिळविण्यासाठी मजबुरीने मी एवढी लग्न केली. माझा नाईलाज होता. कोणतीही गोष्ट ठरवून केली नाही असे अबू अब्दुल्ला म्हणतात. एकीशी तर त्यांनी केवळ एका रात्रीपुरते लग्न केल्याचे ते सांगतात. त्यांचे बहुतेक लग्न हे सौदी महिलांशी झाले आहेत. आता मात्र वयाची ६३ वर्षी झाली असून आता लग्न करणार नाही असे म्हणत त्यांनी माघार घेतली आहे.