NATIONAL NEWS वर्गमैत्रिणीची तिघांनी मिळुन इज्जत लुटली! व्हिडिओ केला व्हायरल! ११ वीच्या पोरांत एवढी क्रूरता येते कुठून?

 
3
शाजापूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): अभ्यासाच्या नोट्स देतो असे म्हणत ११ वीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्या ३ दोस्तांनी बलात्कार केला. एवढेच नव्हे तर त्या संबंधाचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मध्यप्रदेशातील शाजापूर मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून तिच्या ३ वर्गमित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या तक्रारीनुसार १८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. कॉलेज सुटल्यानंतर तिच्या अतिशय जवळच्या मित्राने तिला नोट्स देतो असे म्हणत वर्गातीलच एका दुसऱ्या मित्राच्या घरी नेले. तिथे आधीपासून त्याचा आणखी एक मित्र आला होता. घरी कुणीही नसल्याची संधी साधत आधी तिघांनी तिला अश्लील चित्रफित दाखवली. त्यानंतर तिघांनी आळीपाळीने तिची इज्जत लुटली. दरम्यान या प्रकारचा त्यांनी व्हिडिओ बनवला. बदनामीच्या भीतीपोटी मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही.

 मात्र या प्रकारानंतर त्या बलात्कारी पोरांची हिम्मत वाढली. शरीरसुखाच्या मागणीसाठी ते तिच्याकडे तगादा लावू लागले. तिने नकार दिल्यावर त्यांनी तिचा तो व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकारानंतर मुलीने आईवडिलांना सोबत घेत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अकरावीत शिकणाऱ्या तिघा अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान एवढ्या कमी वयात एवढी क्रूरता अंगात येते तरी कशी असा प्रश्न या प्रकरणामुळे सगळ्यांनाच पडलाय.