NATIONAL NEWS अन् संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याच्या अंडरवेअर मध्ये पेट्रोल टाकून पेटवले! प्रायव्हेट पार्ट जाळला; गावातल्या महीलांसमोर करायचा घाणेरडे कृत्य!

 
बैतूल( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्याचे अत्यल्प प्रमाण आणि निकाल लागण्यासाठी लागणारा वर्षानु वर्षांचा कालावधी यामुळे आरोपींची हिम्मत वाढते. मात्र प्रकरण कोर्टात घेऊन गेल्यापेक्षा एकदाचा लावू सोक्षमेक्ष असे म्हणत एक चांगलाच पराक्रम करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता चर्चेत आली आहे. गावातील महिलांना स्वतःचा प्रायव्हेट पार्ट दाखवून अश्लील चाळे करणाऱ्या एका तरुणाला गावकऱ्यांनी अजब शिक्षा दिली.  तरुणाला पकडुन त्यांच्या अंडरवेअर मध्ये पेट्रोल टाकून त्याचा प्रायव्हेट पार्ट जाळून टाकण्यात आला. या घटनेत त्या तरुणाला प्रायव्हेट पार्ट ५० टक्के जळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बैतूल जिल्ह्यातील काजली गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजली गावातील दिपचंद नावाचा विकृत तरुण महिलांना पाहून अश्लील चाळे करायचा. गावातील महिला शेतात किंवा पाणी आणायला गेल्यावर तो रस्त्यात उभे राहून स्वतःचे कपडे काढायचा आणि प्रायव्हेट पार्ट महिलांना दाखवायचा.

 गावातील महिलांनी पुरुषांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. पुरुषांनी दिपचंद ला समज दिली होती मात्र तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल जाणवत नव्हता. घटनेच्या दिवशी त्याने पुन्हा विकृत कृत्य करत प्रायव्हेट पार्ट महिलांना दाखवाला. त्याचवेळी गावातील सुदेश आणि कृष्णा या तरुणांनी त्याला पकडले. दिपचंद च्या अंडरवेअर मध्ये पेट्रोल टाकून त्याला आग लावली.

यामुळे विकृत दिपचंद चा प्रायव्हेट पार्ट ५० टक्के जळाला. गावातील एका हौदात उडी मारून त्याने त्याचे होणारे मोठे नुकसान टाळले. याप्रकरणात पोलिसांनी प्रायव्हेट पार्ट जाळणाऱ्या तरुणांना अटक केली असून याप्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान विकृत दिपचंद वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.