NATIONAL NEWS महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहावर केला बलात्कार! पकडले जाण्याच्या भीतीने अफवा पसरवली, म्हणाला बाईला भुताने झपाटले...!!

 
jgjhg
गुवाहाटी(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): नदीत अंघोळ करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा २३ वर्षीय तरुणाने खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पकडले जाण्याच्या भीतीने त्याने त्या बाईवर भुताने रेप केल्याची अफवा पसरवली. मात्र अखेर तरुणाचे बिंग फुटलेच , शेवटी त्याने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आसामच्या उदलगुरी जिल्ह्यात ही घटना घडली.

संशयित आरोपी तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार २५  ऑगस्टला महिला गावाशेजारच्या नदीवर अंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी तरुणाने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला . मात्र पीडित महिला वाचली तर आपल्या बलात्काराचे पिंड फुटेल अशी भीती त्या तरुणाला वाटली. त्यामुळे त्याने महिलेची हत्या केली. त्यानंतर महिलेच्या मृतदेहावर त्याने बलात्कार करून मृतदेह फेकून दिला. दोन दिवसांनी महिलेचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. महिलेचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यातही महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार केल्याचे समोर आल्यावर साऱ्यांनाच धक्का बसला.
     
म्हणाला भुताने झपाटले...!

दरम्यान हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर हत्या करणारा तरुण बिथरला. गावातील काहींना हाताशी  धरून त्याने त्या महिलेवर कुणीतरी काळी जादू केल्याची अफवा पसरवली. हे कृत्य एखाद्या भुताने केले असून महिलेला भुताने झपाटले होते अशी अफवा त्याने गावभर पसरवली. दरम्यान पोलिसांनी मात्र बारकाईने तपास सुरू केल्यानंतर आपण वाचणार नाही याची खात्री तरुणाची झाली. शेवटी त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.