NATIONAL NEWS लग्नानंतर २३ दिवसांनी बायको निघाली ३ महिन्यांची गर्भवती! मेव्हण्याने केला होता पराक्रम! पुढे जे झालं ते धक्कादायक

 
kkkk
पिलिभीत(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): उत्तर प्रदेशातील पिलिभीत मध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नानंतर २३ व्या दिवशी विवाहिता ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. लग्नाआधी बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच मेव्हण्याने हा पराक्रम केल्याचे तिने जातपंचायत मध्ये सांगितले.
त्यानंतर जातपंचायतीने विवाहितेला मेव्हण्यासोबत राहण्याचे सांगितले. नवऱ्याला घटस्फोट देऊन दोघेही सोबत राहू लागले. मात्र महिनाभरात मेव्हण्याने तिचा खून केला.

त्याचे झाले असे की सुनीता ( नाव बदलले आहे) हीचा विवाह जुलै महिन्यात प्रतीक सोबत झाला होता. लग्नाच्या २३ दिवसांनी सूनिताच्या पोटात दुखु लागले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुनीता ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकारामुळे सूनिताचा नवरा प्रतीक प्रचंड संतापला. सुनिता ने तिच्या भाऊजी मुळे तिला गर्भ राहिल्याचे सांगितले. त्यामुळे जातपंचायतिच्या बैठकीत सुनीता च्या भाऊजी ला सुद्धा बसवण्यात आले.

जातपंचायतने सुनीता आणि प्रतीक मध्ये घटस्फोट झाल्याचे जाहीर करून सुनीता ला वागविण्याची जबाबदारी आता तिच्या भाऊजी ची असल्याचे सांगितले. त्यानेही तिला वागवायला होकार दर्शविला आणि लग्न न करताच दोघे सोबत राहू लागले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सूनिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या संशयास्पद स्थितीत दिसून आला. ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप सूनिताच्या भावाने केला आहे.